esakal | महिलेचा विनयभंग केल्यामुळे डॉक्‍टरला अटक

बोलून बातमी शोधा

A case has been registered against a doctor for molesting a woman in Sangamner }

पोलिसांनी शेख यास अटक करून संगमनेर न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार बन्सी टोपले करीत आहेत.

महिलेचा विनयभंग केल्यामुळे डॉक्‍टरला अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहरात एका डॉक्‍टरने महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्‍टरवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्‍टरला अटक केली आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डॉ. इरफानअली शब्बीरअली शेख हे फॅमिली डॉक्‍टर असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी जात होते. त्याचा गैरफायदा घेत शेख हे वारंवार आपला पाठलाग करत. बुधवारी (ता. 24) शेख याने पाठलाग करून विनयभंग केला. तसेच माझ्या व माझ्या भावाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली. 

पैशांच्या वादातून चौकातच तरुणाचा खून

पोलिसांनी शेख यास अटक करून संगमनेर न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार बन्सी टोपले करीत आहेत.