A case has been registered against Rampur sub sarpanch for stealing government water
A case has been registered against Rampur sub sarpanch for stealing government water

शासकीय पाण्याची चोरी केल्याप्रकरणी रामपूरच्या उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी (अहमदनगर) : रामपूर गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पाऊण इंची अनधिकृत जलवहिनी जोडून स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय पाण्याची चोरी केल्याप्रकरणी रामपूरच्या उपसरपंचा विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

जिल्ह्यात 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी गुरुवारी सोडती 
 
उपसरपंच राहुल रावसाहेब साबळे (रा. रामपूर) असे आरोपीचे नाव आहे. रामपूरच्या ग्रामसेवक प्रतिभा गोरक्ष भरसाकळ (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, राहुल साबळे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस रामपूर-सोनगाव रस्त्यालगत पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पाऊण इंच अनधिकृतपणे जलवाहिनी जोडणी केल्याचे तीन फेब्रुवारी २०२१ रोजी आढळले. साबळे यांनी स्वतःच्या घरात अनाधिकृत नळजोडणी करून शासकीय पाण्याची चोरी केली आहे.

ग्रामस्थांची तक्रार !

राहुल साबळे यांनी मागील ३० वर्षांपासून गावाच्या पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत नळजोडणी करून शासकीय पाण्याची चोरी करीत आहेत. अशी लेखी तक्रार ग्रामस्थ मनीषा मोरे, रावसाहेब पठारे, नितिन खळदकर, दत्तात्रेय नालकर, सुनिल पठारे, दिलीप खळदकर, बाळासाहेब नालकर, शिवाजी नालकर, अनिल पठारे, किशोर पठारे, रवी पठारे, गवजी लोखंडे, केशव लोखंडे, भास्कर नालकर, गोकुळ शिंदे, सतीश भोसले, इंद्रभान भोसले, राजू मोरे यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली होती. नळ जोडणी बंद करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा उपोषण केले जाईल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे घटनास्थळी ग्रामसेविकाच्या अधिपत्याखाली खोदकाम करुन, पंचनामा करण्यात आला. त्यानुसार साबळे यांच्यावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com