esakal | जिल्ह्यात 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी गुरुवारी सोडती

बोलून बातमी शोधा

Sarpanch posts of 35 gram panchayats in Ahmednagar district remain vacant}

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

ahmednagar
जिल्ह्यात 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी गुरुवारी सोडती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्‍त राहिली आहे. त्यासाठी येत्या 25 व 26 रोजी आरक्षण सोडत काढणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मात्र, नंतर संबंधित संवर्गातील उमेदवार नसल्याने 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्‍त राहिली. त्यासाठी फेरआरक्षण काढण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. प्रांताधिकाऱ्यांना त्यासाठीचे अधिकार देण्यात आले. एका प्रांताधिकाऱ्याकडे दोन तालुक्‍यांची जबाबदारी सोपविली आहे. 25 व 26 रोजी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पथदिव्यांचे होणार प्रात्यक्षिक; आयुक्‍तांची मान्यता मिळताच एलईडीचा प्रस्ताव 'स्थायी'त
 
सरपंचपद रिक्‍त राहिलेल्या ग्रामपंचायती : कोपरगाव- तिळवणी, मढी खुर्द, येसगाव. श्रीरामपूर- गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर. नेवासे- जळके खुर्द. राहुरी- चिंचाळे, उंबरे, वळण, मल्हारवाडी, धानोरे. शेवगाव- नवीन दहिफळ, नागलवाडी. श्रीगोंदे- घोडेगाव, वडाळी, आर्वी. जामखेड- गुरेवाडी. कर्जत- तिखी, टाकळी खंडेश्‍वरी, पिंपळवाडी, चिलवडी. नगर- रुईछत्तिशी, पिंप्री घुमट, धनगरवाडी. अकोले- कुंभेफळ, वाशेरे, घोडसरवाडी, जांभळे, परखतपूर, औरंगपूर, तांभोळ, इंदोरी आणि पिंपळगाव खांड.