माजी आमदार कर्डिलेंच्या पुत्र-पुतण्याविरुद्ध गुन्हा

A case has been registered against the son of former MLA Kardile for allegedly violating the Collectors order
A case has been registered against the son of former MLA Kardile for allegedly violating the Collectors order
Updated on

अहमदनगर : बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गर्दी जमवून विजयी उमेदवारांचा सत्कार केला. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले व पुतणे संदीप कर्डिले यांच्यासह 32 जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
याबाबत पोलिस कर्मचारी अजय नारायण नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बुऱ्हाणनगर येथे बुधवारी रात्री नऊ वाजता वरील आरोपींनी ग्रामपंचायत निवडणुकीत बाणेश्‍वर ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात, विनापरवाना एकत्र येऊन सत्कार केला. जमावाने विजयी उमेदवारांचा फेटे बांधून सत्कार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com