वाढदिवस.... "यांना' पडलायं महागात! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पाच पेक्षा अधिक लोकांना गर्दी करण्यास मनाई आहे. मात्र, काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पाच पेक्षा अधिक लोकांना गर्दी करण्यास मनाई आहे. मात्र, काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

विनायकराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय वाखुरे, अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयूर कुलकर्णी, निखील मोयल यांच्यासह 35 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विनय वाखुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील एका दुकानासमोर गर्दी करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे कोणीही पालन केले नाही. अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेले नव्हते. विनय वाखुरे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कुठलीही परवानगी घेतली नव्हती, असे पोलिस कर्मचारी अजय गव्हाणे यांनी फिर्यादी म्हटले आहे. 

दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांच्यावरही वाढदिवसाच्या दिवशी गर्दी जमविल्याचा आणि तोंडाला मास्क न लावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrated birthdays by crowding in public places