
"Visarjan joy turns tragic as youth dies of heart attack during Ganesh procession."
Sakal
कोल्हार : गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत असतानाच भगवतीपूर (ता. राहाता) येथील विसर्जन मिरवणुकीवर दुःखाचे विरजण पडले. थडीफाटा वस्तीवरील ओंकार रवींद्र खर्डे (वय १७) या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटात नाचल्यानंतर त्याने पाणी प्राशन केले आणि काही क्षणातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि तो गतप्राण झाला.