अंगणवाड्या-शाळांना नळजोड; सरकारचे जलमिशन अभियान, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी

दौलत झावरे
Wednesday, 20 January 2021

जलमिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोड देण्याची मोहीम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतली आहे.

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारतर्फे जलमिशन योजनेंतर्गत गावांतील कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या मिशन अंतर्गत सर्व शाळा व अंगणवाड्यांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 4780 पैकी 632 शाळा व 5555 पैकी 1545 अंगणवाड्यांना आता नळजोड दिले जाणार आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

जलमिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोड देण्याची मोहीम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतली आहे. त्याचे काम जिल्ह्यात वेगात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा-अंगणवाड्यांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. जिल्ह्यात 4780 शाळा असून, त्यातील 4612 शाळांची राष्ट्रीय योजनेकडे ऑनलाईन नोंदणी झाली आहे.

हे ही वाचा : निलेश लंके यांनी आमदार पदाचा दर्जाच घालवला : सुजित झावरे

त्यातील 3980 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अद्याप 632 शाळांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. आता शाळांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. काही शाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील 5555 पैकी 5243 अंगणवाड्यांची राष्ट्रीय योजनेकडे ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यातील 3698 अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. 1545 अंगणवाड्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांना आता नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची प्रकिया सुरू झालेली आहे. 

जलमिशन अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. 
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची 100 दिवसांची मोहीम हाती घेतली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. 
- परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जलमिशन अभियान 

शाळांची आकडेवारी 

एकूण शाळा ः 4780 
पाणी उपलब्ध शाळा ः 3980 
नळजोड नसलेल्या शाळा ः 632 

एकूण अंगणवाड्या ः 5555 
पाणी उपलब्ध अंगणवाड्या : 3698 
नळजोड नसणाऱ्या अंगणवाड्या ः 1545 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Central and State Governments have undertaken a campaign to provide plumbing to every household under the Water Mission