
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा आमदार निलेश लंके यांनी केला होता.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत झावरे व औटी गटाच्या ताब्यात आल्या आहेत. मात्र आमदार निलेश लंके हे करत असलेला दावा खोटा व दिशाभूल करणारा आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केला आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा आमदार निलेश लंके यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर झावरे यांनी पत्रकाराशी सवांद साधला आहे. झावरे म्हणाले, ज्याठिकाणी आमदारांनी सभा घेतल्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यातून गेलेले आहे. खर तर आमदार पद असलेल्या व्यक्तीने ग्रामपंचायतीमध्ये बुथवर बसून पैसे, मटण, दारू वाटून आमदार पदाची शान घालवली आहे.
हे ही वाचा : जाऊबाई जोरात: आमदार मोनिका राजळेंची जावेसाठी रणनीती; सासूबाई पराभूत!
विरोध हा तात्विक असावा, वैयक्तिक नसावा ही वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे नाही. हे तालुक्याचे दुर्दैव आहे. बिनविरोध ग्रामपंचायतचा फॉर्म्युला हा वरवर पाहता स्तुत्य जरी असला तरी त्याला तालुक्यातील जनतेने नाकारले याच उत्तर त्यांच्या बिनविरोध करण्या मागचा हेतू शुद्ध नव्हता. माझ्या वासुंदे गावातील ग्रामपंचायतीमध्ये गेले ५० वर्षात अपवाद वगळता ग्रामपंचायतची निवडणूक ही बिनविरोध होत होती. या बिनविरोधच्या परंपरेला लोकप्रतिनिधीनी खीळ घातली आहे. गावातील काही लोकांना हाताशी धरून निवडणूक लावण्यास भाग पाडले व त्यांचा ही बळी दिला. गावात सभा घेतल्या, पहाटेपर्यंत मळा-मळात बैठका घेतल्या, परंतु ३०० ते ४०० च्या मताच्या फरकानं माझ्या स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले.
हे ही वाचा : सोनई ग्रामपंचातीमधील सदस्यांची अशीही दर्यादिली
जे विरोधात आले ते तीन मतांनी निवडून आले. एकंदरीत गावात दुफळी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. लोकप्रतिनिधीला साजेशे हे वर्तन नाही. त्यामुळे त्याचा खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. ७० ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असलेची वलग्ना करणे हे लोकप्रतिनिधीचा बालिशपणा आहे. दुसऱ्याच्या शैक्षणिक संस्थेमध्ये हस्तक्षेप करणे तिथे आपल्या पत्नीची वर्णी लावण्याचा प्रयत्न करणे. हे सामाजिक असभ्यतेचे लक्षणे आहे. आगामी काळात तालुक्यातील ज्वलनंत प्रश्नावर काम करून कार्यकर्त्याना ताकद देण्याचे काम आम्ही करणार आहेत.