esakal | डॉ. कराड पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरवतील - भास्करगिरी महाराज
sakal

बोलून बातमी शोधा

Central Finance State minister Dr. Bhagwat Karad visit devgad Bhaskar Giri Maharaj

डॉ. कराड पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरवतील - भास्करगिरी महाराज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नेवासे (जि. अहमदनगर) : जनतेप्रती समाजसेवेची असलेली निष्ठा ही केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांची जमेची बाब होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा विश्वास डॉ. कराड सार्थ ठरवतील असे गौरवोद्गार श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी काढले.

केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले राज्यसभा सदस्य तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी श्रीक्षेत्र देवगड (ता, नेवासे) येथे रविवार (ता. ५) रोजी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी डॉ. कराड यांचा संस्थानच्या वतीने स्वागत व सत्कार भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

आत्मिक समाधान लाभले : डॉ. भागवत कराड

श्री क्षेत्र देवगड येथील मंदिराचा निसर्गरम्य परिसर पाहून समाधान व मनाला आनंद आणि ऊर्जा निर्माण होते. दर्शनाने व परिसरात आल्याने आत्मिक समाधान लाभले असून ऊर्जा मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: शेतकऱ्यांचा आनंद हेच समाधान : प्राजक्त तनपुरे

मंदिर बंद असल्याने बाहेरूनच घेतले दर्शन

दरम्यान मंत्री डॉ. कराड यांनी प्रारंभी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भगवान दत्तात्रेय, किसनगिरी बाबा समाधीचे मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेतले तसेच भास्करगिरी महाराज यांचा सत्कार करून दर्शन घेतले.

यावेळी औरंगाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रसिद्ध गायक बजरंग विधाते, राम विधाते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, महेंद्र फलटणे, मोहन आहेर, बाळासाहेब महाराज कानडे, व्यवस्थापक चांगदेव साबळे, मनोज चोपडा, कल्याण दांगोडे, किशोर धनायत, गोपिनाथ वाघ, भीमाशंकर नावंदे, दत्ता शिंदे, आदिनाथ पटारे, अंकुश काळे उपस्थित होते.

हेही वाचा: 70 हजारांची नोकरी सोडून बनला शेतकरी, आता महिन्याला कमावतो 9 लाख!

loading image
go to top