esakal | 70 हजारांची नोकरी सोडून बनला शेतकरी, आता महिन्याला कमावतो 9 लाख!
sakal

बोलून बातमी शोधा

shashikant shinde is earning rs 9 lakh a month from pomegranate farming

70 हजारांची नोकरी सोडून बनला शेतकरी, आता महिन्याला कमावतो 9 लाख!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

तिसगाव (जि. नगर) : भोसे (ता. पाथर्डी) येथील एका तरुण शेतकऱ्याने ७० हजार रुपये महिन्याची नोकरी सोडून तो आता शेती करत आहे. शेतीतून नऊ लाख रुपये महिन्याला कमावत आहे. शशिकांत भरत शिंदे (वय ३९) असे या तरुणाचे नाव आहे.

शिंदे याचे शिक्षण बीएस्सी अॅग्री. त्याने पुणे येथे कृषी आयुक्तालयात ७० हजार रुपये महिना असलेली नोकरी सोडली. आपल्या वडीलोपार्जित असलेल्या १६ एकर जमिनीवर पारंपरीक बाजरी, ज्वारी, हरबरा आदी पिकांना फाटा देत फक्त फळबाग लागवड केली. त्यामध्ये पाच एकर डाळींब, पाच एकर संत्रा व पाच एकर सिताफळ लागवड केली आहे. उरलेल्या एक एकरवर एक कोटी लिटर पाणी साचेल एवढे शेततळे तयार केले आहे.

पाच एकर जमिनीत तीन हजार डाळिंबाची झाडे आहेत. मागील वर्षी ७० टन डाळींब विकले. त्याचे सुमारे ५८ लाख रुपये आले होते. या वर्षी माल जादा आहे, तरीही ७० टन गृहीत धरला, तर या वेळी ११५ रूपये किलो असा दर आहे. सुमारे ७० लाख रुपये होणार आहेत. खर्च पाच लाख रुपये वजा जाता निव्वळ नफा फक्त डाळिंबामध्ये ६५ लाख रुपये वार्षिक होतो. संत्रा बागेची ८०० झाडे आहेत. त्याचे मागील वर्षी ५०टन माल आला होता. ३८ रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्याचेही १९ लाख रुपये आले होते. गोल्डन सिताफळ आहेत. त्याचे खर्च वजा जाता १३ लाख रुपये वर्षाकाठी येतात. योग्य नियोजन केल्यामुळे शिंदे हे वर्षात एक कोटी रुपये शेतीतून मिळवत आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांचा आनंद हेच समाधान : प्राजक्त तनपुरे

शिंदे याचे फळपिक घेतानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून एकच पिक घेतात. आंबे बहार धरतात, मात्र तो थोडा उशीरा धरतात. कारण त्यावेळी बहुतेक शेतकऱ्यांचा माल संपत आलेला असतो. संत्रा हे पिक कमी कष्टात व कमी खर्चात घेता येते, पण पाणी जादा लागते. पाथर्डी हा कायम दुष्काळी असल्याने कमी पाण्याचे पिक घेण्यात येते. त्यामुळे डाळिंबाला पसंती असते. शेतीचे बहुतांश कामे ते स्वतः करतात. त्याला भाऊ व वडील मदत करतात. गरजेपुरतेच मजूर लावतात. स्वतः काम करत असल्याने बागेत होणारा बदल त्यांच्या लक्षात येतो. काय कमी पडले किंवा जादा झाले, हे जाणून ते पुढची दिशा ठरवतात.

फळपीक हे कमी पाण्यात कमी कष्टात जादा उत्पन्न देते. तरुणांनी प्रयोगशिल शेतकरी बनत फळ पिकाकडे वळावे. नोकरीची गरज पडणार नाही.

- शशिकांत शिंदे

हेही वाचा: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात धुमाकुळ घालणारे सराईत अखेर गजाआड

loading image
go to top