esakal | शेतकऱ्यांचा आनंद हेच समाधान : प्राजक्त तनपुरे
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Tanpure

शेतकऱ्यांचा आनंद हेच समाधान : प्राजक्त तनपुरे

sakal_logo
By
पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : राहुरी विधानसभा मतदारसंघात कोलमडून पडलेल्या उर्जा विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्राधान्य दिले. वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने मिळण्यासाठी नवीन दीडशे रोहित्र दिले. नवीन रोहित्र मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते, असे प्रतिपादन ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

बारागाव नांदूर येथे वीज रोहित्राचे लोकार्पण व मुळा नदीवरील पुलाच्या कामासाठी पूर्वपाहणी प्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्कर भालेराव होते. प्रभाकर गाडे, श्रीराम गाडे, मच्छिंद्र गाडे, नवाज देशमुख, उपसरपंच इजाज सय्यद, निवृत्ती देशमुख, सागर तनपुरे उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, ‘‘निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी अग्रक्रम असतो. मुळा नदीपात्राच्या पलीकडे असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी लवकरच पुलाचे बांधकाम केले जाईल. त्यासाठी ग्रामविकास निधी अंतर्गत २५ लाख रुपयांची तरतूद केली जाईल. या पुलामुळे १०३ शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल.’’ नगराध्यक्षपदी असताना शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा: पुरात वाहून गेली जनावरे! पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना हूरहूर

loading image
go to top