

Central team returned after inspecting only western Pathardi; flood-hit eastern region left unseen.
Sakal
पाथर्डी: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची पाहणी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने केली. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आणि नुकसान पाथर्डी तालुक्यात झाले आहे. या पथकाने पश्चिम भागात झालेल्या नुकसानीचीच पाहणी केली, तालुक्यातील पूर्व भागात ही मोठे नुकसान झाले असले तरीही या पथकाने पूर्व भागाची पाहणी केली नाही.