सीईओंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती, ग्रामसेवक निलंबित

दौलत झावरे
Thursday, 17 December 2020

या आढावा बैठकीला सर्वच अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या योजनांची व जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कामांची व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ही कामे करताना कामात हलगर्जीपणा यापुढे चालणार नाही.

नगर ः पाथर्डी तालुक्‍यातील आरोग्य, घरकुलाचे कामे, विकास कामांचा आढावा आज (गुरवारी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आढावा घेतला. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

या बैठकीला पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित राहणाऱ्या एका ग्रामसेवकावर तातडीने निलंबन करण्याचा आदेश दिल्यानंतर एका ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी पाथर्डी तालुक्‍यात आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकाळी साडेदहापासून आढावा बैठक सुरु केली होती.

हेही वाचा - पवार-शिंदे यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष पेटणार

या बैठकीत रोजगार हमी योजनेंतर्गत हरहर गोटे घरघर गोटे, आरोग्य, जलजीवन मिशन अंतर्गत सर्व घरांना 100 टक्के व्यक्तीगत नळ जोड योजना, चौदा वित्त आयोग, महाआवास अभियानांतर्गत नवीन घरकुलांना मंजुरी, अपुऱ्या घरकुलांचा आढावा तसेच इतर सुरु असलेल्या तालुक्‍यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला.

या आढावा बैठकीला सर्वच अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या योजनांची व जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कामांची व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ही कामे करताना कामात हलगर्जीपणा यापुढे चालणार नाही.

प्रत्येक कामाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी दिल्या. दरम्यान, या बैठकीला ग्रामसेवक पूर्व परवानगी न घेता गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधिताचे कामही अत्यल्प असल्याचे समोर आल्यानंतर तातडीने ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश क्षीरसागर यांनी जारी केला. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आलेले आहे.

दरम्यान, या संदर्भात पाथर्डीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले एका ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आलेले असून एका ग्रामपंचायतीचे चौकशीचे आदेश मुख्य कार्यखारी अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.

अल्हनवाडी ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश

अल्हनवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता आढळून आल्याने या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिलेले आहे. त्यामुळे अल्हणवाडी ग्रामपंचायतीची लवकरच चौकशी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CEOs take action against officials