कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार-राम शिंदे आमने-सामने

Rohit Pawar-Ram Shinde clash again in Karjat-Jamkhed
Rohit Pawar-Ram Shinde clash again in Karjat-Jamkhed

कर्जत : तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आणि ऐन हिवाळ्यात या गावांतील राजकीय वातावरण गरम झाले. विविध राजकीय पक्षांच्या गावपातळीवरील नेत्यांनी या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

शिवाय राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्यामुळे नेते व इच्छुकांची मोठी धावपळ उडाली आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, अनेकांची कोंडी झाली आहे. त्यासाठी केलेली पूर्वतयारी धुळीस मिळाली आहे. 

तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यावर गावकीचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला जाणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षण लांबणीवर पडल्याने अनेकांना आता वाट पाहावी लागणार आहे. सरपंचपदाचा "सस्पेन्स' राहिल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. 

ग्रामपंचायत ताब्यात असणे, म्हणजे मोठी राजकीय इभ्रत मानली जाते. तसेच सरपंचपद हे मानाचे. अलीकडे सर्वाधिक निधी ग्रामपंचायतीला मिळतो. त्यामुळे आपसूकच सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातून सगळी जुळवाजुळव करताना, प्रस्थापितांना नाकीनऊ येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच निवडणूक होत असल्याने, नियम-अटीसह काही बंधने पाळावी लागणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर राहणार, यात शंकाच नाही. 

निवडणूक होणाऱ्या 56 ग्रामपंचायती 
मिरजगाव, निमगाव गांगर्डे, चापडगाव, पाटेवाडी, दिघी, कोंभळी, चिलवडी, थेरवडी, दूरगाव, बेनवडी, भांबोरे, बारडगाव दगडी, बारडगाव सुद्रिक, जलालपूर, पिंपळवाडी, टाकळी खंडेश्वरी, पाटेगाव, मलठण, निमगाव डाकू, चिंचोली काळदात, डिकसळ, नांदगाव, वालवड, मांदळी, कोकणगाव, बेलगाव, गुरवपिंपरी, रवळगाव, वडगाव तनपुरे, करपडी आखोणी, शिंपोरे, दुधोडी, सिद्धटेक, राक्षसवाडी खुर्द व बुद्रुक, तळवडी, धालवडी, नागापूर, बाभूळगाव खालसा, तरडगाव, खंडाळा, खांडवी, चांदे खुर्द व बुद्रुक, चिंचोली रमजान, थेरगाव नागमठाण, भोसे, रुईगव्हाण, सुपे, तिखी, नागलवाडी, रातंजण, घुमरी, रेहकुरी. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com