
अहिल्यानगर: एमएचटी-सीईटीमार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभियांत्रिकी परीक्षेतील चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका बसला होता. आता विधी महाविद्यालयाच्या (लॉ कॉलेज) प्रवेश प्रक्रियेत मुदतीत सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरली गेली नाहीत. परिणामी आरक्षित जागांऐवजी खुल्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागत आहे.