
पाथर्डी : तालुक्यातील एका खेड्यातून आलेल्या २७ वर्षीय युवतीने पोलिस ठाण्याच्या आवारातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या युवतीला पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही युवती पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या एका बाकावर बसली होती. बाकावर बसूनच तिने आपल्याकडे असलेल्या विषाच्या बाटलीतील विष प्राशन केले.