
Chaundi village submerged as centenary flood of Sina River forces 100 families to relocate.
Sakal
-संतराम सूळ
जामखेड: गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच सीना नदीला आलेल्या महापुराने लगतची हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून, चौंडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी वाढत असल्याने आज (ता. २८) दिवसभर चौंडीचा संपर्क तुटला होता.