
संगमनेर: आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख यांच्यासह इतरांनी माझा मुलगा प्रसाद याची फसवणूक केली. आमच्या कुटुंबाची बदनामी करून दबाव निर्माण केला, असा तक्रार अर्ज प्रसाद यांची आई अनिता अप्पासाहेब गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.