
अहिल्यानगर : एमआयडीसी येथे एका गोडाउनमध्ये तब्बल ६२ लाख रूपयांचा बनावट बासमती तांदूळ आढळून आला आहे. साध्या तांदळाला केमिकल पावडर लावून बासमती राईस असे नाव असलेल्या एका मोठ्या ब्रॅण्डच्या बॅगेत हा तांदूळ भरला जात होता. अन्न व औषध प्रशासनाने या गोडाउनवर छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणी अद्याप संबंधित गोडाउन मालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अन्न- औषधच्या या कारवाईबाबत उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे.