
अहिल्यानगर: शहरातील प्रोफेसर चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनपर्यंत पुतळा बसवलेला नाही. या कामातील दिरंगाईबद्दल अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले.