esakal | अनैतिक संबंधातून जन्मलेले मूल टाकले काटवनात

बोलून बातमी शोधा

A child born out of an immoral relationship is thrown away}

कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक आढळले. याबाबत त्याने वस्तीवरील रहिवाशांना माहिती दिली.

अनैतिक संबंधातून जन्मलेले मूल टाकले काटवनात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः शहराच्या पूर्वेस, कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापूर शिवारात, जेडगुले वस्तीजवळील काटवनात नवजात अर्भक बेवारस आढळून आले. 

समनापूर शिवारातील जेडगुले वस्तीवरील नाना चिमाजी जेडगुले (वय 22) शेतात जात असताना त्याला काटवनात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक आढळले. याबाबत त्याने वस्तीवरील रहिवाशांना माहिती दिली. काही महिलांनी अर्भक ताब्यात घेऊन त्याला स्वच्छ केले. 

दरम्यान, याबाबत पोलिस पाटील गणेश शेरमाळे यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. हवालदार राजेंद्र डोंगरे, सुभाष बोडखे, वनिता चोखंडे यांच्यासह पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. अर्भकाला टाकून देणाऱ्या मातेचा शोध घेतला.

अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्भकास घुलेवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. याबाबत पोलिस पाटील शेरमाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल केला. 
 
महिला बाळाला सांभाळण्यास तयार 
दरम्यान, या परिसरातील रंजना भाऊसाहेब जेडगुले यांनी या बेवारस मुलास सांभाळण्याची तयारी दर्शविली आहे. मुलाचे चांगले संगोपन करण्याची ग्वाही त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही मागणी पूर्ण होण्याची शक्‍यता धूसर आहे.