esakal | लेकाचा दगडाने डोके ठेचून हत्या करणारी आई पोलीसांच्या जाळ्यात; नाटकी टाहो फोडल्याने संशय
sakal

बोलून बातमी शोधा

mother arrested

लेकाचा दगडाने डोके ठेचून हत्या करणारी आई पोलीसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (जि.अहमदनगर) : रामडोह (ता. नेवासे) रस्त्याच्या पाटचारी रस्त्याचे कडेला मंगळवार (ता. ६) रोजी सकाळी दगडाने डोके ठेचून छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत सोहमचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. याप्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. घटना उघड झाल्यापासून पोलिसासह ग्रामस्थांना या निर्घृण हत्येबाबत त्याच्या सावत्र बापावर संशय होता. मात्र पोलिस निरीक्षक विजय करे व त्यांच्या पथकाला चोवीस तासात मुख्य खूनाचा तपास लावण्यात यश आले. (child-murdered-by-mother)

नाटकी कृत्यामुळेच ती जाळ्यात अडकली

प्रारंभी सोहम'चा मृतदेह पाहून नाटकी टाहो फोडणाऱ्या सीमाने पोलिस तपास दरम्यान पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. तिने अनेकांवर संशय घेतले. पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान तपासात मिनिटा-मिनिटांना दिशाभूल करणारी माहिती ती पोलिसांना देत असल्याने पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला आणि तिने रचलेल्या कुभांडामुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अलगत अडकली.

हेही वाचा: साईसंस्थान विश्‍वस्त निवडीला 2 आठवड्यांची प्रतीक्षा

आईनेच केला मुलाचा खून; चार दिवसांची पोलिस कोठडी

सोहमची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे (वय ३२ रा. वरखेड, ता. नेवासे) हिनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान नेवासे पोलिसांनी सीमाला खुनाच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वरखेड (ता. नेवासे) येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आईनेच मुलाचा खून केला आहे.

"सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सिमा हिला अटक केली आहे. यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे. - विजय करे, पोलिस निरीक्षक, नेवासे

हेही वाचा: भाजपकडून सत्तेसाठी इडी-सीबीआयचा वापर : मुश्रीफ

loading image