हुक्का पार्लरमध्ये दम मारताना सापडली ही बड्या घरची पोरं-पोरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

छाप्यात सापडलेली सर्व मुले बड्या घरची आहेत. विशेष म्हणजे त्यात मुलींचाही  समावेश आहे. 

नगर : लॉकडाउनमध्ये शासनाने हळूहळू शिथिलता आणली असली तरी अद्याप हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही. तरीही काहीजण आडरानात दम मारत आहेत.

नगर-दौंड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने काल रात्री छापा घालून वीस जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. छाप्यात सापडलेली सर्व मुले बड्या घरची आहेत. विशेष म्हणजे त्यात मुलींचाही  समावेश आहे. 

हेही वाचा - मिलिटरीच्या सेवेतून रजेवर आला नि डायरेक्ट चोरच झाला

हुक्का पार्लरमध्ये सापडलेल्यांची नावे अशी ः श्रेयस संजय कोठारी (वय 28, बुरडगाव रोड), अभिषेक अदाके संचेती (वय 30, रा. बुरूडगाव रोड), आदित्य सतीश ईदाणी (वय 30, रा. महेश टॉकीज मागे), मोहीत कृष्णाकांत शहा (वय 26, रा. खिस्त गल्ली), अंकित महेश लुणिया (वय 30, रा. माळीवाडा), अंकित अमृतलाल कोठारी (वय 28, रा. वसंत टॉकिज), घनश्याम बारकू ठोकळ (वय 40, रा. समर्थनगर बुरूडगाव), किरण छगनराव निकम (वय 39, रा. बुरूडगाव रोड), गणेश संजय डहाळे (वय 24, रा. तोफखाना), रोहित नितीन शहा (वय 23, रा. खिस्त गल्ली), दीपक जितेंद्र गिडवानी (वय 23, रा. शिलाविहार, पाईपलाइन), यश कन्हैयालाल लुभिया (वय 23, रा. मिस्कीनगर, सावेडी), आदित्य गोरख घालमे (वय 25, रा. गुजरगल्ली), करण विजय गुप्ता (वय 24, रा. गंजबाजार), किसन चंद्रकुमार माखिजा (वय 25, रा. प्रोफेसर कॉलनी), महिमा शाहुल बनकर (वय 23, रा. आनंद पार्क सारसनगर), सिमरन संजय पंजाबी (वय 23, रा. घुमरे गल्ली), हॉटेल व्यवस्थापक अरुण बाबासाहेब ढमढेरे यांचा समावेश आहे. त्याच्यासह 19जणांना ताब्यात घेतले. हॉटेल मालक सतीश किसन लोटके यांचा आरोपींमध्ये समावेश अाहे. ते पसार आहेत.

जाणून घ्या - मुलगी गेली - आई-बाप म्हणतात साप चावला...डॉक्टरांना वेगळाच संशय

अधिक माहिती अशी, नगर - दौंड रस्त्यावरील अरणगाव (ता. नगर) येथे एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर व दारूविक्री सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस शंकरसिंह रजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा हॉटेल फुडलॅंड छापा घातला असता 18 व्यक्ती वेगवेगळ्या टेबलवर बसून हुक्का पितांना आणि दारू पितांना आढळून आले. हॉटेलचालक सर्व ग्राहकांना सेवा देत होता.  

त्या 18 जणांसह हॉटेलचालकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हुक्का पिण्याचे साहित्य, विदेशी दारू असा 18 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस कर्मचारी ज्ञानेश्‍वर खिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल करीत आहेत.

पोलिसांनी प्रतिबंंधात्मक कारवाई त्यांची जामिनावर मुक्तता केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The children of the big house were found in a raid in a hookah parlor