
नवीन जिल्हाधिकारी प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आज चर्चा केली. त्यांनी चौंडीची पाहणी केली आहे. त्यांनी कामास गती देऊ, असा विश्वास दिला आहे.
नगर ः पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथील विकास प्रकल्प रखडला आहे. हा विकास प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी माजी मंत्री अण्णा डांगे यांनी केली.
चौंडी येथील प्रकल्पाबाबत डांगे यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डांगे म्हणाले, की चौंडीतील प्रकल्पाचे काम काही दिवसांपासून रखडले आहे. तेथील काही योजना अजूनही अपूर्ण आहेत.
नवीन जिल्हाधिकारी प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आज चर्चा केली. त्यांनी चौंडीची पाहणी केली आहे. त्यांनी कामास गती देऊ, असा विश्वास दिला आहे.
1995मध्ये चौंडी येथे अहल्यादेवी यांचा 200वा पुण्यतिथी कार्यक्रम झाला.
हेही वाचा - एकदाच लागवड खर्च, आता पैसाच पैसा
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे त्यास उपस्थित होते. स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जोशी यांनी दिले होते. त्यानुसार प्रकल्प आराखडा तयार करण्यास सांगितले. मी दोन कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आराखडा तयार केला.
मुंडे यांनी पाच कोटींचा आराखडा तयार करण्याची सूचना केली. तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्यामुळे पाच कोटींचा निधी मिळाला. तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना विनंती केल्यावर, त्यांनी एक कोटींचा निधी दिला. हा निधी सध्या जिल्हा परिषदेकडे आहे. पाच कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे डांगे यांनी सांगितले.