महापालिकेने लावले दिवे! बंद पथदिव्यांमुळे नागरिक झाले त्रस्त

महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली
street lights
street lights

अहमदनगर : शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. मात्र, त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने प्रक्रिया थांबली. दरम्यान, शहरातील अनेक पथदिवे बंद असल्याने नागरिकांमधून पदाधिकारी व प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महापालिकेच्या निधीतून शहरातील महामार्गांवरील पथदिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे.

जामखेडची "ऑक्‍सिजन' लेव्हल घटली; 425 रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली धाकधूक

महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. तिसऱ्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्याने पथदिव्यांचे काम सुरू होईल असे वाटत असतानाच, याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यामुळे हे काम सुरू होण्यास अवधी लागण्याची शक्‍यता आहे. शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे महापालिका व पर्यायाने शहराबाबत बाहेरगावांहून येणाऱ्या नागरिकांत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागली. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील महामार्गांवरील पथदिवे महापालिका निधीतून बसविण्यास सुरवात केली आहे. हे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 10 रस्त्यांवर सोडियम व टी-फाइव्ह प्रकारचे पथदिवे बसविण्यात आले आहेत.

आज कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे बसविण्याचे काम सुरू होते. या कामासाठी विद्युत विभागप्रमुख राजेंद्र म्हेत्रे यांनी पथक तयार केले आहे. या पथकाने आतापर्यंत 80 टक्‍के काम पूर्ण केले आहे. यात पथदिवे, वायर बदलण्याचे काम करण्यात येत आहे. आठवडाभरात उर्वरित कामही पूर्ण होणार आहे. नगरसेवकांच्या निधीतून शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या पथदिव्यांची कामे होणार आहेत. पथकात विद्युत परिक्षक अंतावन क्षेत्रे, अजित तारू, वायरमन अरविंद गायकवाड, शादाब खान, वाहनचालक प्रेमचंद छजलानी आदींचा समावेश आहे.

संगमनेरमध्ये नागरिकांचा मुक्त संचार सुरूच

या पथांवर बसविले दिवे

- पत्रकार चौक ते सर्जेपुरा

- पत्रकार चौक ते पोलिस अधीक्षक कार्यालय चौक

- अप्पू हत्ती चौक ते सिद्धिबाग

- बालिकाश्रम रस्ता (पंचशील हॉटेल ते सुडके मळा)

- गुलमोहर रस्ता

- पाइपलाइन रस्ता

- सक्‍कर चौक ते इलाक्षी शो-रूम

- इंडस्ट्रिअल एरिया ते बायपास

- नगर-मनमाड रस्ता

- नगर-कल्याण रस्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com