

New Medical College Announced; Admissions to Begin Next Year
sakal
-समीर दाणी
अहिल्यानगर: जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’च्या निर्मिती प्रक्रियेला वेग आला आहे. सिव्हिल हॉस्पिटल हे सात वर्षांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय कौन्सिलचे पथक तपासणीसाठी येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील फलक बदलला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.