श्रीरामपूर तालुकावार्ता : हरेगावात बिबट्याची दहशत कायम

गौरव साळुंके
Wednesday, 14 October 2020

हरेगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढली असुन बिबट्याचा बछड्यांसह रात्री संचार सुरु आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील हरेगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढली असुन बिबट्याचा बछड्यांसह रात्री संचार सुरु आहे. हरेगाव परिसरात वाढलेल्या झाडेझुडपांमुळे बिबट्यासह चोरट्यांची धास्ती वाढली आहे. परिसरातील अनेक रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडेझुडपांची साफसफाई करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हरेगाव येथील महिलांनी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील अनावश्यक झाडेझुडपांची छाटणी करावी तसेच बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीचे निवेदन सरिता वाहुळ, लता फासाटे, शालिनी दुशिंग, रत्नमाला जाधव यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना आज दिले. यावेळी नंदा गायके, मंगल सातदिवे, शोभा शिरसाठ, सुनीता कसबे, सविता भनगडे, सुनीता फुलवर उपस्थित होत्या. 

श्री पद्मावती मातेचा नरात्रौउत्सव साधेपणात
श्रीरामपूर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कान्हेगाव येथील आदिशक्ती श्री पद्मावती मातेचा नरात्रौउत्सव यंदा साधेपणात साजरा होत आहे. उत्सव काळात साधेपणाने धार्मिक पुजापाठ केला जाणार असुन भाविकांनी मंदीर परिसरात गर्दी करु नये, असे आवाहन श्री पद्मावती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पाटील यांनी केले आहे. 

दरवर्षी नवरात्रौउत्सव काळात येथील मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रा काळात मंदीरात मोठी गर्दी असते. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. परंतू यंदा कोरोनामुळे विविध धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. गर्दी टाळून यंदा फक्त धार्मिक विधीपूजाला प्राधान्य दिले. जाणार असुन भाविकांनी मंदीर ट्रस्टसह प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांकडे महिला सुरक्षतेची मागणी
श्रीरामपूर : राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन पिडीतांना न्याय देण्यासाठी भाजपाच्या हरेगाव येथील महिला कार्यकर्यांनी कालच्या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला. हरेगाव, उंदिरगाव येथील महिला कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्यात विविध मागणीच्या निवेदन देवुन महिला सुरक्षतेची मागणी केली. 

महिलांना सुरक्षा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असुन राज्यातील तिन पक्षाचा भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडे व जिल्हा चिटणीस अनिल भनगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सरिता वाहुळ, अनिता भालेराव, सुनीता फुलवर, लता फासाटे, शालिनी दुशिंग, रत्नमाला जाधव, मंगल सातदिवे, नंदा गायके, शोभा शिरसाठ, सुनीता कसबे उपस्थित होत्या. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Click here to read all the news from Shrirampur taluka