सगळं वातावरणच बदलंय राव, आजारी पडणारच

शांताराम काळे
Friday, 25 December 2020

सकाळी फिरण्यासाठी जाणारी गर्दी कमी झाली आहे. तर वन्य प्राणी जंगलातून शहराकडे, गावाकडे येऊ लागली आहेत. जनावरांना फऱ्या रोगाची लागण झाली आहे. ठिकठिकाणी शेकोटी पेटवली जात आहे. 

अकोले : तालुक्‍यात ऋतुमान चक्रे उलटे फिरू लागली आहेत. पहाटे, सकाळी धुके, दुपारी कडक ऊन, सायंकाळी पाऊस तर रात्री थंडीमुळे पिके, जनावरे, वन्य प्राण्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

कोरोनाच्या भीतीमुळे घरातील माणसे आता सर्दी, खोकला, तापेने बेजार झाली आहेत. दवाखाने फुल झाली आहेत. सध्या थंडीचा महिना असून थंडी तर आहेच पण तिने धुके, ऊन, पाऊसही सोबत आणल्याने एकच वेळी तिन्ही ऋतु एकत्र आल्याने पृथ्वीवरील सर्वच प्राणी, मानव अस्वस्थ झाले आहेत.

हेही वाचा - हे मोबाईल अॅप तुम्हाला करील कर्जबाजारी

सकाळी साडेआठ वाजले तरी धुके हटत नाहीत. तर धुके गेले की दहानंतर कडक ऊन व सायंकाळी पावसामुळे रात्री कडक थंडीने जनतेचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यातच कोरोनाची भीती आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडेनासे झाले आहेत.

सकाळी फिरण्यासाठी जाणारी गर्दी कमी झाली आहे. तर वन्य प्राणी जंगलातून शहराकडे, गावाकडे येऊ लागली आहेत. जनावरांना फऱ्या रोगाची लागण झाली आहे. ठिकठिकाणी शेकोटी पेटवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Climate change increases illness