संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्यावतीने गरजू कुटुंबाना केली मदत

आनंद गायकवाड 
Thursday, 12 November 2020

गरजू कुटूंबांच्या मदतीसाठी संगमनेर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नित्य वापरांच्या कपड्यांचे संकलन केले.

संगमनेर (अहमदनगर) : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यभरात असलेल्या कोरोनाच्या सावटाचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीने भर घातल्याने, शेतकरी व शेत मजुरांसमोरील समस्याही वाढल्या आहेत. अशा गरजू कुटूंबांच्या मदतीसाठी संगमनेर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नित्य वापरांच्या कपड्यांचे संकलन केले.

हे ही वाचा : अकोले संगमनेर रस्त्याचे खड्डे तात्काळ भरण्यासाठी माजी आ. वैभवराव पिचड यांचा कार्यकारी अभियंताच्या दालनात ठिय्या

संकलीत कपडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्यावतीने एक दिवा त्यांच्यासाठी उपक्रमांतर्गत अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम पाचनई गावातील आदिवासी बांधवांना देण्यात आले.

हे ही वाचा : पारनेर ग्रामीण पतसंस्थेमार्फत सभासदांना ११ टक्के लाभांश वाटप

या उपक्रमाची माहिती देताना प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी सांगितले, महाविद्यालयातील रासेयो कक्ष सामाजिक जाणीव ठेऊन नेहमी समाजाच्या मदतीसाठी तत्पर असतो. कोरोना लॉकडाऊन कालावधीत गरजूंना अन्नधान्य वाटप, कुटुंबांचे सर्वेक्षण, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत शासकीय यंत्रणेस मदत, तसेच मास्क तयार करून त्यांचे वाटप या जबाबदाऱ्या स्वयंसेवकांनी घरी राहून यशस्वी पार पाडल्या. एक दिवा त्यांच्यासाठी उपक्रमांतर्गत आदिवासी कुटुंबांना केलेल्या कपड्यांच्या मदतीमुळे या कुटुंबाला दिवाळीची भेट मिळाली आहे.

यावेळी प्रा. शशिकांत बैरागी, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, कार्यक्रम आधिकारी डॉ. सचिन कदम, प्रा. संदीप देशमुख उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clothes were presented to the tribal brothers on behalf of the National Service Planning Department of Sangamner College