पारनेर ग्रामीण पतसंस्थेमार्फत सभासदांना ११ टक्के लाभांश वाटप

Kashinath Date said that the decision to pay 11 percent dividend to the members through Parner Gramin Patsanstha has been approved.
Kashinath Date said that the decision to pay 11 percent dividend to the members through Parner Gramin Patsanstha has been approved.

टाकळी ढोकेश्वर (नगर) :  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०६० चे कलम ६५ नुसार सन २०१९-२० च्या नफा विभागणीतून संचालक मंडळाने सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचा ठराव मंजूर केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.

बुधवार (ता.११) रोजी पारनेर येथील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची सभा पार पडली, त्यावेळी दाते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब सोबले, संचालक रखमाजी कापसे, लक्ष्मण डेरे, मयुर गांधी, सुरेश बोराडे, अर्जुन गाजरे, रामदास दाते, शिवाजी काळे, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, सुनील गाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात उपस्थित होते.

दाते म्हणाले, संस्थेच्या २४९६ सभासदांना संस्थेमार्फत रुपये ४० लाख १९ हजार ८४४ रुपये लाभांश रक्कम सभासदांचे सेव्हिंग खात्यावर वर्ग करण्याचे ठरविण्यात आले. संस्थेला या आर्थिक वर्षात १ कोटी ५५ लाख ४५ हजार ६५ रूपये निव्वळ नफा झाला आहे. ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे. संस्थेकडे १५१ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. ११७ कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. ४७ कोटी रुपये विविध बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे नगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र आहे. संस्थेच्या आठ शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com