
अहिल्यानगर : राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. हे महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, या मागणीसाठी गुरुवारी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून आमदार जगताप यांना आश्वासन दिले.