
CM Devendra Fadnavis
Sakal
शिर्डी (जि. अहिल्यानगर): ‘‘सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची नाडी ओळखून स्वास्थ जपले. कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नांची पूर्तता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करतील. त्याचाच एक भाग म्हणून उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी पूर्वेच्या गोदावरी खोऱ्यात आणले जात आहे. येत्या पाच ते सात वर्षांत आम्ही दुष्काळाचे रूपांतर भूतकाळात करू,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.