
अहिल्यानगर: गेल्या दहा वर्षांत मी नगरसेवक म्हणून केवळ विकासकामेच केली नाहीत, तर सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात प्रभागातील बहिणींसोबत खंबीरपणे उभा राहिलो. माझे नाते हे फक्त मतदार व नगरसेवकापुरते मर्यादित नाही, तर कौंटुबिक आहे. राखी पौर्णिमेनिमित्त इतक्या मोठ्या संख्येने बहिणींनी माझ्यावर विश्वास दाखवून राखी बांधली ही माझ्यासाठी खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले.