

CM Devendra Fadnavis
sakal
अहिल्यानगर : अनुसूचित जमाती संवर्गात बंजारा जमातीचा समाविष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत बैठक बोलावून शिष्टमंडळाच्या निवेदनावर चर्चा केली.
बंजारा समाजाचे मागासलेपण, सामाजिक व आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग अथवा समिती नेमली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना, अहिल्यानगर जिल्ह्याचे अशासकीय सदस्य विष्णुपंत पवार यांनी दिली.