“Committee approves withdrawal of 11 cases registered during the Maratha reservation agitation; legal process underway.”
Sakal
अहिल्यानगर
माेठी बातमी! 'मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू; अकरा गुन्हे मागे घेण्यास समितीची मान्यता..
Relief for Protesters: नगर जिल्ह्यात मागच्या २०२४ वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी ११ गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत. त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलिसांद्वारे सुरू करण्यात आली आहे.
अहिल्यानगर: गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात मुंबईत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

