esakal | एकाच गावातील ३५ तरुणांचे मोबाईल हॅक; महिलांना पाठवीले अश्‍लिल मेसेज
sakal

बोलून बातमी शोधा

Complaint lodged with police regarding hacking of mobile phones of 35 people in Akole taluka

कातळापूर गावात ५० पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे हॅकर्सने मोबाईल हॅक केले आहेत.

एकाच गावातील ३५ तरुणांचे मोबाईल हॅक; महिलांना पाठवीले अश्‍लिल मेसेज

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील कातळापूर गावात ५० पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे हॅकर्सने मोबाईल हॅक केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो, पत्नी, आई, बहिण, मुलगी यांच्या विषयी अश्लील भाषेत मेसेज आल्याने गावातल्या गावातच मेसेज आल्याने तरुणांनी एकमेकाची गच्ची व शिवीगाळ सुरु केली. तर त्यातच दुसऱ्या गावातूनही काही लोक कातळापूर गावात येऊन त्यांनीही एका तरुणाला चोप दिला. त्यामुळे गावात संतप्त वातावरण झाले. 

याची चौकशी करण्याची मागणी राजूर पोलिस स्टेशनकडे तरुणांनी केली आहे. याचे निवदेन माजी आमदार वैभव पिचड यांनाही देण्यात आले आहे. अण्णासाहेब खाडगिर, बलवान उघडे, राजू खाड्गीर, सचिन गावंडे, भास्कर तातळे, भाऊसाहेब साबळे, दत्तू काठे, श्रावण काठे, वाळू धिंदले, गोरख काठे, भरत काठे, विठ्ठल नाडेकर आदी ३५ तरुणांना व काही महिलांना वाईट व घाणेरडे मेसेज पाठवून संबधित हॅकर त्यांना चालेंज करत असून तुम्हाला कुठे जायचे तिथे जा माझे कुंनीच काही करू शकत नाही. माझे ज्ञान मला वाचवू शकते, असा मेसेज करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटलं आहे. 

इंटरनेट स्वस्थ झाल्याने आता हॅकर्सनी आपला मोर्चा कम्प्युटरऐवजी मोबाइल वापरकर्त्यांकडे वळवला आहे. मोबाइलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोबाइलची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे. कातळापूर गावात हा हॅकर  कोण आहे याचा शोध सुरु असून राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली असून सायबर क्राईमला तक्रार पाठविण्यात आली आहे.

मोबाइल कसे हॅक होतात?
हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाइल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्रे मिळवू शकतात.  
- जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या मोबाइल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर सहज जोडता येते. त्यामुळे ते फोन हॅकर्सच्या जाळ्यात फसतात.
- मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेली) नागरिकांना पाठविली जाते आणि नागरिकांना फोन करून त्या लिंकवर पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो.

अलीकडे इंटरनेट सर्फिंग मोबाइलवरून करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. स्वस्त इंटरनेटमुळे मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच आता हॅकर्सनी आपला मोर्चा कम्प्युटरऐवजी मोबाइल वापरकर्त्यांकडे वळवला आहे. मोबाइलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोबाइलची सुरक्षा एक कळीचा मुद्दा बनला आहे.


संपादन : अशोक मुरुमकर