esakal | वारी चुकेल रे हरी...वारकऱ्यांची विठ्ठलाला आर्त हाक
sakal

बोलून बातमी शोधा

Concerns of Warkaris about Pandhari Wari

मे महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे दिंडी,पालखीच्या नियोजनाचा काळ असतो. परंतु यंदा कशी सामसूम आहे. जायचं तर कसं आणि सरकार परवानगी देणार का, असे जर तरचे प्रश्न आहेत. नगर जिल्ह्यात 48 वर्षांची परंपरा असलेली शिस्तबद्ध दिंडी म्हणून श्रीक्षेत्र देवगडच्या पालखीचा नावलौकिक आहे. परंतु यंदा काहीच नियोजन झालेले नाही. सरकारच्या निर्णयाकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.

वारी चुकेल रे हरी...वारकऱ्यांची विठ्ठलाला आर्त हाक

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : ‘पंढरीची आषाढी वारी.... हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. ते एक व्रत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला सदगुणाचा संस्कार आहे. जाती-भेदाच्या अमंगळ कल्पनांना तिथे थारा नाही. वारकऱयाच्या जीवनात कितीही संकटं आली तरी पंढरीची वारी तो चुकवत नाही. हरिपाठाच्या अभंगात पंढरीची वारी चुकू न हरी..अशी आळवणी केली जाते. घरातील कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह झाकून शेतकरी पेरणी करतो आणि पंढरीच्या वारीवरून माघारी फिरत नाही. संत तुकाराम महाराजांचेही त्यां संदर्भातील अभंग आहेत. यंदाचं संकट मात्र वेगळंच आहे. त्यामुळे वारकऱ्याला वारी चुकते की काय अशी चिंता लागली आहे.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे दिंडी,पालखीच्या नियोजनाचा काळ असतो. परंतु यंदा कशी सामसूम आहे. जायचं तर कसं आणि सरकार परवानगी देणार का, असे जर तरचे प्रश्न आहेत. नगर जिल्ह्यात 48 वर्षांची परंपरा असलेली शिस्तबद्ध दिंडी म्हणून श्रीक्षेत्र देवगडच्या पालखीचा नावलौकिक आहे. परंतु यंदा काहीच नियोजन झालेले नाही. सरकारच्या निर्णयाकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - भाजपात परतला राम..चौंडीत राम शिंदे यांचे आंदोलन

आषाढी एकादशीच्या वारीसाठी भाविकांनी नाव नोंदणीसाठी तर संस्थानची दिंडी नियोजनाची मे महिन्यापासूनच जोरदार तयारी होत असते. आषाढी एकादशी (ता. 1) जुलैला आहे. त्यासाठी परंपरेनुसार सुमारे तीन आठवडे आधी म्हणजे (ता. 12, 13) जून रोजी अनुक्रमे देहू येथून संत तुकाराम यांची, तर आळंदीतून संत ज्ञानेश्वकर यांच्या पालखीचे प्रस्थान नियोजित आहे. शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता, मोठ्या आयोजनावरचे निर्बंध आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वारीवर अजुनही अनिश्चितेचे सावट आहे. 

आषाढी महोत्सवनिमित होणाऱ्या विठ्ठालाच्या दर्शनाकडे सर्व भक्तांचे डोळे लागून आहेत. यंदा पंढरपुरात जुलैपर्यंत आषाढी महोत्सव राहणार आहे. हा महोत्सव “याचि देही याचि डोळा' अनुभवण्याकरिता राज्यातील लाखो भाविक दिंडी व पालखीच्या च्या माध्यमातून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून आषाढी एकादशीच्या दोन-तीन दिवसांपूर्वी पंढरपूर येथे दाखल होतात. यंदा वारीविषयी काहीच सांगता येत नसल्याने वारी चुकेल रे हरी... असा आर्त धावा वारकरी करीत आहे. 

जाणून घ्या - प्रशासनाच्या चलता है...भूमिकेमुळेच कर्जतमध्ये कोरोनाचा शिरकाव

जिल्ह्यात 550 दिंडयात 20 हजार भाविक
नगर जिल्ह्यातील बहुतांशी दिंडी व पालखी जून महिन्यात तिथीनुसार प्रस्थान करतात. यामध्ये श्रीक्षेत्र देवगड, सरला बेट, नेवासे येथील संत ज्ञानेश्वर संस्थान, भगवानगड, गहिनींनाथ गड, शनिशिंगणापूर संस्थान, डोंगरगण, ताहाराबाद, या प्रमुख दिंड्यांसह विविध देवस्थानच्या लहान-मोठ्या सुमारे पाचशे-साडेपाचशे दिंड्यां-पालख्या निघतात. यामध्ये सुमारे 18 ते 20 हजार भाविक पायी आषाढी वारीत सहभागी असतात. 

"शासन-प्रशासनाच्या अधीन राहून भक्तांसाह जनतेच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाच्या आदेशानुसार दिंडीचा निर्णय घेतला जाईल. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर देवगडची संपूर्ण देवालय व परिसर लॉकडाउनच्या सावटाखाली आहे. दिंडीत येणाऱ्या भाविकांची प्रवेश निश्चिती महिनाभर अगोदर होत असते. परंतु या वर्षीच्या कामांत कोणतीच सुरुवात झाली नाही.
-गुरुवर्य भास्करगिरी महाराज, प्रमुख, श्रीक्षेत्र देवगड संस्थान. 
 

loading image