Ahmednagar ; दहा रुपयांच्या नाण्यांबाबत संभ्रम

ग्रामीण भागात दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार
ahmednagar news
ahmednagar news esakal

शहरटाकळी : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह ग्रामीण भागात दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास काही ठिकाणी नकार मिळत आहे. बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.दहा रुपयांचे नाणे व्यवहारात सर्वत्र वापरले जाते. मात्र, शहरटाकळी, दहिगावने या ग्रामीण भागात दहा रुपयांचे नाणी कोणी स्वीकारण्यास तयार नाही. हे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे.

हे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचनांचे फलक सर्व बँकांनी, पतसंस्थांनी आपापल्या शाखेत लावल्यास ग्राहकांमधील गैरसमज दूर होईल, असे मत शहरटाकळी येथील व्यापारी अंकुश नवले यांनी व्यक्त केले आहे.

दहा रुपयांचे नाणे चलनात आहे, मात्र ते स्वीकारण्याची नकारात्मक मानसिकता झाली आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून दहा रुपयांची नाणी स्वीकारतो. ग्राहक व व्यापाऱ्यांनी नाणी चलनात आणण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.

- गणेश राऊत, औषध विक्रेते, शहरटाकळी

दहा रुपयांची नाणी चलनातून बंद झालेली नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ती स्वीकारण्यास काही हरकत नाही. व्यापारी व नागरिकांनी ही नाणी स्वीकारली पाहिजेत.

- राजेंद्र गांधी, किराणा दुकानदार, शहरटाकळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com