भाजप- राष्ट्रवादीच्या अभद्र युतीमुळेच नगरचा विकास खुंटला; काँग्रेसच्या नेत्याचे टीकास्त्र

अमित आवारी
Tuesday, 29 December 2020

नगर महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अभद्र युती आहे. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून देखील शहराचा विकास खुंटला आहे.

अहमदनगर : नगर महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अभद्र युती आहे. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून देखील शहराचा विकास खुंटला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सेल्फी विथ तिरंगा मोहिमे प्रसंगी पक्ष कार्यालयात काळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निजाम जहागीरदार, डॉ. रिजवान अहमद, मागासवर्गीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे उपस्थित होते.

काळे म्हणाले की, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट झाले आहे. घंटागाडी शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकत नसल्यामुळे अनेक महिलांचे हाल होत आहेत. पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील ओढे-नाले रातोरात गायब होत आहेत, असे काळे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress alleges that BJP and NCP did not develop the city