

Balasaheb Thorat interacting with Congress workers during the protest condemning the attack on the district president.
Sakal
श्रीरामपूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल दीड वाजेपर्यंत सुरू राहिले. आंदोलनादरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.