

Shrirampur farmers inspect their rain-damaged Kharif crops; demand for immediate government compensation intensifies.
Sakal
-महेश माळवे
श्रीरामपूर : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अखंड पडणाऱ्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीच्या पावसाने उरले-सुरले खरिपाचे पीक संपवले असून, रब्बी हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ‘पेरायचं कसं आणि पिकवायचं कसं’ या प्रश्नाने बळीराजा पुन्हा चिंतेच्या भोवऱ्यात सापडला आहे.