

Contract electricity workers celebrating after the court declares them permanent employees following a 13-year-long legal struggle.
Sakal
अकोले : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमधील २२८५ कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्यावे, यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या व महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार महासंघातर्फे प्रदीर्घ दिलेल्या लढ्याला यश आले. कंत्राटी कामगारांना कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे, असे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. झेड. सोनभद्रे यांनी दिल्याची माहिती कंत्राटी कामगार महासंघाचे जिल्हा सचिव सचिन पाटील यांनी दिली.