
अहिल्यानगर: राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत कंत्राटदारांनी विकासाची कामे पूर्ण केली. त्याची सुमारे ९० हजार कोटीची बिले शासनाकडे प्रलंबित आहेत. ही बिले मिळावीत यासाठी आम्ही विविध संघटनांमार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा केला, आंदोलने केली. परंतु सरकारने कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. त्यानिषेधार्थ आज कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आठ दिवसात थकीत देयके दिली नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी कंत्राटदारांनी दिला आहे.