

Copper Cable Theft Gang Arrested; Four Lakh Worth Material Recovered, Google Maps Used in Crime
Sakal
अहिल्यानगर : गुगल मॅपच्या आधारे महावितरणचे सबस्टेशन शोधून त्या ठिकाणाहून कॉपर वायरची चोरी करणारी परराज्यातील टोळी पोलिसांनी पकडली आहे. आरोपींकडून चार लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्यात तीन ठिकाणी अशी चोरी केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.