नगरमध्ये कोरोना ब्लास्ट ः एकाच दिवसात तब्बल वीस रूग्ण

corona blast in Ahmednagar
corona blast in Ahmednagar

नगर ः कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज (मंगळवारी) सकाळी प्राप्त झालेल्या 51 अहवालांमध्ये 11 जण कोरोनाबाधित आणि उर्वरित 40 जण निगेटिव्ह आढळून आले.

रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 49 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आज एकूण वीस जण कोरोनाबाधित आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 172 झाली आहे. 

जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अकोल्यातील सात जणांचा समावेश आहे. यामध्ये जांभळे येथील 48 व 24 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष, बोरी येथील साठवर्षीय महिला, वाघापूर येथील 32 व 40 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

संगमनेरमध्ये चार जण बाधित आढळले. त्यात संगमनेर शहरातील 36 वर्षीय महिला व अडीच वर्षांचे बाळ, डिग्रस, मालुंजे येथील 21 व 45 वर्षीय महिलांचा समावेश आहे. श्रीगोंद्यातील कोंडेगव्हाण येथील 75 वर्षीय महिला आणि लोणी (ता. राहाता) येथील 56 वर्षीय व्यक्तीही आज कोरोनाबाधित आढळून आली.

नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील भवानीनगर येथील बाधित रुग्णाची पत्नी व चार वर्षांची मुलगी, एक 28 वर्षीय युवक, माळीवाड्यातील 42 वर्षांची व्यक्ती, केडगाव येथील 29 वर्षीय युवक आणि स्टेशन रस्ता परिसरातील 33 वर्षीय महिलेचा आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. 

पाच जणांना डिस्चार्ज 
जिल्ह्यातील एकूण पाच जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना आज घरी सोडण्यात आले. त्यात वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर), संगमनेर, म्हसणे फाटा (ता. पारनेर) येथील प्रत्येकी एकाचा आणि नगर तालुक्‍यातील दोन जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 78 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

तालुकानिहाय कोरोना रुग्ण 
नगर शहर ः 30, संगमनेर ः 37, राहाता ः 11, जामखेड ः 15, नेवासे ः चार, कोपरगाव ः एक, पाथर्डी ः एक, अकोले ः आठ, श्रीगोंदे ः दोन, श्रीरामपूर ः एक, नगर तालुका ः तीन, कर्जत ः पाच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com