
कोरोनाचा सुरवातीचा काळ अतिशय कठीण होता. त्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा दिल्या.
नगर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणार असल्याचे महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुद्गल यांनी सांगितले.
त्यानुसार पतसंस्थेचे सभासद (स्व.) आशिष छजलानी, रघुनाथ घोरपडे, शंकर भागानगरे, कुसुमबाई बोरगे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - नियती किती क्रूर असते बघा
सुरेश इथापे म्हणाले, ""कोरोनाचा सुरवातीचा काळ अतिशय कठीण होता. त्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा दिल्या. महापालिका कर्मचारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत मृत सभासदांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.
नानासाहेब गोसावी, शंकर मिसाळ, विजय बालानी, उपाध्यक्ष विकास गिते, जितेंद्र सारसर, किशोर कानडे, सतीश ताठे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार आदी या वेळी उपस्थित होते.