esakal | नाशिकच्या शास्त्रज्ञाने कांदा उत्पादकांसाठी शोधले 'स्मार्ट तंत्र'! नाफेड करणार तंत्रज्ञानाचा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

ONION SENSOR

नाशिकच्या शास्त्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी शोधले स्मार्ट तंत्र!

sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : राज्यात शेतकरी राजाचे कांदा हे नगदी पिक. हातात दोन पैसे पडावे म्हणुन गरजेनुसार टप्प्या-टप्प्याने कांदा विक्री करतो. त्यासाठी तो कांदा चाळीत साठवतो पण हे कांदे वातावरणामुळे सडायला लागतात. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर नाशिक येथील शास्त्रज्ञ डाॅ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सेंन्सर तयार केला असुन त्याचे प्रात्यक्षिक लासलगांव येथे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे तसेच नाफेड नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकुर यांच्यासमोर सादर केले. (Scientists-in-Nashik-invent-smart-machine-for-farmers-nashik-agriculture-news)

नाफेड करणार 'या' तंत्रज्ञानाचा वापर

चुकीच्या साठवणूक पध्दतीमुळे साधरण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो अन् शेतकऱ्यांचे नुकसान होते. चाळीमध्ये कांदा सडण्यास सुरुवात झाल्या बरोबर जर शोधता आले तर उरलेला कांदा वाचविता येतो. यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. या दृष्टीने नाशिक येथील वैज्ञानिक प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सेन्सरचा उपयोग करत उपरकण बनवले आहे. अमोनिया, आद्रता आणि गॅस मुळे सडलेला कांदा या उपकरणामुळे शोधून काढता येईल. या उपकरणाचा डेमो नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना दाखविण्यात आले. नाफेडच्या वतीने हे उपकरण प्रमोट करण्याचे आश्वासन नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिले आहे.
कांदा चाळीत सदरचे उपकरण ठेवून कांद्याची आद्रतेवरून कांदा चाळीत कुठल्या भागात सडला आहे हे उपरकण सेन्सरद्वारे दर्शवितो. या उपकरणामुळे खराब होणारा कांदा तात्काळ लक्षात येऊन तो चाळीतून बाहेर काढून बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचविता येईल.

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

सेंन्सर असे करते काम...

शेतकरी अथवा व्यापारी यांनी साठवलेल्या कांदा चाळीच्या जवळ सदर सेंन्सर बसवावा. कांदा चांगला असल्यास सेंन्सर सायरन देत नाही, कांदा हळुहळु सडायला लागल्यास त्यातील अमोनिया, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड वायु बाहेर पडु लागल्यास कांदा सडायला सुरुवात होते; त्यावेळी सायरन सुरु होतो, त्या चाळीतील कांदा लवकर विक्री करुन नुकसान टाळता येते.
सेंन्सर बनवायला साधारणपणे 15 ते 20 हजार रुपये खर्च असुन बॅटरीच्या सहाय्याने कार्यरत असते. हाताळायला सोपे आहे. नाफेड सारख्या एजन्सी मध्ये याचा वापर झाल्यास नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते.

''कांदा बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ उतार हे पाहून या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला. यांचा अभ्यास करताना असे लक्षात आलं, शंभर किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ३०-४०% कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय योजना गरजेची आहे हे जाणवलं यातून या उपकरणाची निर्मिती करण्याचे सुचले आणि ते कृतीत उतरविले.'' - प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, वैज्ञानिक

(Scientists-in-Nashik-invent-smart-machine-for-farmers-nashik-agriculture-news)

हेही वाचा: नाशिककरांसाठी चामरलेणी परिसर ठरतोय ‘विकेंड डेस्टिनेशन’

loading image