esakal | राशीनच्या बाधित रूग्णाची श्रीगोंदा-बारामती भ्रमंती..पुण्यातून आणला वानोळा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patient found in Rashin

गेल्याच आठवडयात राशीनमधील रूग्णांची संख्या सहावरून शून्य झाली होती.

राशीनच्या बाधित रूग्णाची श्रीगोंदा-बारामती भ्रमंती..पुण्यातून आणला वानोळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राशीन : कर्जत तालुक्यात पुणे आणि मुंबईकरांमुळे बाधा झाली होती. गेल्याच आठवड्यात तालुका कोरोनामुक्त झाला होता. परंतु पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यावेळी परजिल्ह्यातील नागरिकामुळे नव्हे तर राशीनमधीलच व्यक्तीमुळे कोरोना चोरपावलांनी आला आहे.

विवाहित मुलीच्या डोक्‍यावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या रूग्णालयात दहा दिवस थांबलेल्या राशीनमधील साठ वर्षीय पित्याला कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित रूग्णाच्या कुटूंबातील पाच आणि बाहेरील दोघे मिळून सात जणांना घशातील स्त्राव तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रूग्णालयात नेले आहे. यामध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे.

राशीनकर वैतागले

मुंबई-पुण्यातून कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार वानोळा येत असल्याने राशीनकरांनी चांगलाच धसका घेतला आहे. सर्वसामान्यांसह व्यापारपेठेतही याची दहशत आहे. सुमारे तीन महिने लॉकडाऊनचा सामना करणारे राशीनकर कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे मेटाकुटीला आले आहेत.

आधी श्रीगोंद्यात उतरले

आज (ता.20) पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला रूग्ण पुण्याहून मुलीचे ऑपरेशन झाल्यानंतर श्रीगोंदे येथे आला. त्यांना रक्‍तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याने ते श्रीगोंदयातील खासगी रूग्णालयात प्रथम दाखल झाले. तेथून राशीनच्या खासगी रूग्णालयात येऊन तपासणी केल्यानंतर त्यांना निमोनियाची लक्षणे असल्याचे समोर आले. 

हेही वाचा - जिल्हा क्रीडा अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

खासगी वाहनाने ते बारामती येथील खासगी रूग्णालयात गेले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी तुमच्या जिल्हा रूग्णालयात अगोदर तपासणी करा असा सल्ला दिल्यानंतर ते दौंड मार्गे नगर जिल्हा रूग्णालयात मंगळवारी (ता.16) रोजी दाखल झाले. तेथे तपासणीनंतर त्यांचा आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

गेल्याच आठवडयात राशीनमधील रूग्णांची संख्या सहावरून शून्य झाली होती. संबंधित रूग्ण पुण्याहून मुलीच्या सासरी (श्रीगोंदे) येथे आल्यानंतर त्यांना खोकला, ताप आणि घशाचा त्रास होऊ लागला.

संबंधित रूग्ण राहत असलेल्या प्रभाग तीनमधील तो भाग राशीन ग्रामपंचायतीतर्फे सील करण्यात आला आहे.

बाजारपेठ बंद नको...
गेल्या चार दिवसांपासून राशीनची बाजारपेठ खुली करण्यात आल्यानंतर आणखी एक नवा रूग्ण सापडल्यानंतर राशीनमधील व्यापाऱ्यांनी संबंधित भाग सील करा परंतु संपूर्ण बाजारपेठ बंद करू नये असा सूर लावला. मात्र, प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.