कोरोनाचे आज १९चे वक्कल... सुडके मळा, भिंगार, कुरण बनले कुरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाचा नगर जिल्ह्यात कहर सुरूच आहे. दररोज किमान २० रूग्ण येत आहेत. आज दुपारी आलेल्या अहवालात १९ बाधित आढळले.

नगर ः कोरोना रिपोर्टने काल विश्रांती घेतली असे वाटत असतानाच आज पुन्हा मोठी संख्या आली. त्यामुळे जिल्ह्यात धास्ती वाढली आहे.

आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या.

नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बागरोजा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थनगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली.

हेही वाचा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संबंध

भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष,  ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.

श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील३२ वर्षीय व्यक्ती (कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient at Sudke Mala, Bhingar, Kuran

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: