पारनेच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मार्तंड बुचुडे
Thursday, 23 July 2020

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या रविवारी (ता. 19 ) राज्यमंत्री अब्दुल सत्तार पारनेर तालुक्यात सुपे येथे आले असताना त्यांच्या संपर्कात आल्या होत्या.

पारनेर (अहमदनगर) : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या रविवारी (ता. 19 ) राज्यमंत्री अब्दुल सत्तार पारनेर तालुक्यात सुपे येथे आले असताना त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर सत्तार हे पॉझिटिव्ह असल्याचे दुसऱ्या दिवशी समजले. त्यानंतर देवरे यांनी थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

राज्यमंत्री सत्तार हे सुपे येथे आले असताना शिष्टाचार या नात्याने देवरे यांनी त्यांचा सुपे येथे सत्कार केला होता. त्यानंतर सत्तार हे पॉझिटिव्ह असल्याचे समजले होते. त्यानंतर तहसीलदार देवरे यांना त्रास जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  आता देवरे यांची प्रकृती चांगली आहे.

आज तालुक्यातील अनेकांचे अहवाल निगेडिव्ह आले आहेत. त्यात कान्हूर पठार येथील एक अहवाल पोजिटीव्ह वगळता तालुक्यातील 49 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात दैठणे गुंजाळ तीन, पानोली 16 , सुपे पाच,  राळेगणसिद्धी पाच,  कान्हूर पठार 13, ढवळपुरी पाच, पारनेर व करंदी प्रत्येकी एक असे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of Parne tehsildar Jyoti Deore is negative